आम्ही मराठी मराठी

भाग्यविधाते देशाचे आम्ही मराठी मराठी
भाग्य असे आमचे हो आम्ही मराठी मराठी

भक्ति रसात भिजवी वीररसात चेतवी
श्रृंगारसात रमवी करुणरसात आर्तवी
नवरसात न्हाहवी ग्रन्थ संपदा मराठी
भाग्य असे आमुचे हो आम्ही मराठी मराठी

मुकुंद रायांची मराठी , ज्ञाना तुकयाची मराठी
चक्रधरांची मराठी , नामा जनाईची मराठी
दास तुकड्याची मराठी,सकल संतांची मराठी
भाग्य असे आमचे हो, आम्ही मराठी मराठी

शिवरायांची मराठी, लोकमान्यांची मराठी
भिमरावांची मराठी , शाहू फुल्यांची मराठी
बहिणाआईची मराठी, रामानंदांची मराठी
भाग्य असे आमचे हो आम्ही मराठी मराठी

नटसम्राट मराठी, खेळसम्राट ही मराठी
गानकोकिळा मराठी, स्वरभास्कर मराठी
नररत्नांची खाण, प्रसविते माय मराठी
भाग्य असे आमचे हो आम्ही मराठी मराठी

डोंगर माथ्यावर मराठी, सागरतिरीही मराठी
महानगरी मराठी , खेडया पाड्यात मराठी
वनी काननी मराठी, उद्योग क्षेत्रात मराठी
भाग्य असे आमचे हो आम्ही मराठी मराठी

तख़्त दिल्लीचे हालवी, छत्रपति हां मराठी
पानीपत ही गाजवी , अहो बाणा हां मराठी
लाज राखे हिमालयाची, सहयकडा हो मराठी
भाग्य असे आमचे हो आम्ही मराठी मराठी

चला बोलू या मराठी, चला लिहू या मराठी
वाढवू या हो मराठी, बाणा अस्सल मराठी
अभिमानाने बोलू सारे माय बोली ही मराठी
भाग्य असे आमचे हो आम्ही मराठी मराठी
--
सुनिल जोशी
starsvj63@gmail.com

6 comments:

सुहास October 20, 2011 at 1:31 PM  

मस्त !!

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.. :) :)

क्रांति October 20, 2011 at 6:51 PM  

आमच्या मराठी असण्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. चांगली कविता.

Anonymous,  October 20, 2011 at 11:47 PM  

सुंदर कविता ... अगदी जाज्वल्य मराठी बाणा जागृत करणारी आणि 'अमृताताही पैजा जिंकणाऱ्या' अश्या 'मराठी' भाषा मायबोली असणाऱ्या सगळ्यांचा अभिमान वाढवणारी ...

SUNIL JOSHI October 23, 2011 at 9:49 PM  

धन्यवाद मित्रांनो, आपल्या अभिप्राय आणि सुचनांबद्दल, आपले अभिप्राय नक्कीच मला मदत करतील अजुन सुधारणे साठी...

Suresh - सुरेश शिरोडकर November 9, 2011 at 8:10 PM  

मस्त !!
मराठीचा सार्थ अभिमान आहे.

चांगली कविता.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP