व्हेजीटेबल रोल्स

साहित्य:
६-७ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१/२ लाल भोपळी मिरची
१/२पिवळी भोपळी मिरची
१/२हिरवी भोपळी मिरची
२ छोटी गाजरे
१ कान्दा
७-८ लसूण पाकळ्या
६-७ हिरव्या मिरच्या
१ वाटी जाड्या पोह्यांची पावडर
२ चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर (पाण्यात घालून पेस्ट करुन घ्यावी)
लाल मिर्ची
मीठ चवीनुसार


कृती:
उकडलेले बटाटे कुसकरुन घ्यावे,त्यात सर्व भाज्या अगदी बारीक चिरुन घालाव्यात. लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालावी. लाल मिरची व मीठ घालावे. आता सगळे एकत्र करुन मळून घ्यावे आणि त्याचे हातावर छोटे रोल्स बनवून घ्यावेत.

तळण्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवावे. एक एक रोल कॉर्न फ्लॉवरच्या पेस्ट मधे बुडवून घ्यावा. नंतर तो पोह्यांच्या पावडर मध्ये चांगला लपेटून घ्यावा आणि लगेचच तळायला कढईत सोडावा.

जर रोल्स कढईत टाकल्यावर फुटत असल्यास १ चमचा कॉर्न फ्लॉवर घालावे. ४-५ रोल्स एकत्र तळावेत. ९-१० गरम गरम तयार रोल्स टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करावे.
--
उमा सतीश
uma20.satish@gmail.com

13 comments:

सुहास October 20, 2011 1:03 PM  

अहाहा... तोंडाला पाणी सुटेश :) :)

क्रांति October 20, 2011 7:06 PM  

काय सही दिसताहेत रोल्स! मस्त आहे पाकृ. करून पहायला हवी दिवाळीत.

माधुर्य. October 20, 2011 8:50 PM  

मस्तच...करुन पाहीन

davbindu October 21, 2011 12:48 AM  

यम्मी ..सजवलही छान आहेस... :)

mau October 21, 2011 12:49 PM  

धन्यवाद !!!

अपर्णा October 21, 2011 10:43 PM  

यम ओ....
पण काय ग हे बेक पण करता येतात का?

mau October 22, 2011 4:58 PM  

हो का नाही..हे रोल्ल्स बेक ही करता येतील.

Kanchan कांचन October 24, 2011 8:09 PM  

आई बनवते ते ब्रेड रोल्स हा माझा आवडता खाद्यप्रकार. आता हे व्हेजीटेबल रोल्स मी करून पहाते नि मग तुला कळवते. सोप्पेच वाटतायंत. भाज्या न खाणार्‍यांना भाज्या खिलवण्याचा चांगला प्रकार आहे हा ;-))

भानस October 26, 2011 4:59 PM  

मस्तच! आता फराळ खाऊन कंटाळा आला की करावेच लागतील. :)

mau October 31, 2011 1:17 PM  

बनव बनव कांचन..मस्त यम्मी लागतात..:)

mau October 31, 2011 1:19 PM  

भानस,मला तर फराळाबरोबर हे सुद्धा गरम गरम नाश्ता म्हणुन लागतो...बनवुन बघ..आणि सांग कसे लागतात ते..

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP