एक रविवार
सकाळपासून जीभ पट्ट्यास, होते सुरुवात
बिछाने ठेवले का, उचलून आत
बातम्यांचा रतीब, नका हो पाडू
जळमटे दिसतायत नं, घ्या जरा झाडू
लवकर उठून, काय दिवे लावले
आंघोळीचे पाणी, तापलेले निवले
पुरे झाला पेपर, जावून या बाजारात
आठवडी सामान संपले, लक्ष द्या घरात
येताना दीड कीलो चिकन लेग, आणा मस्त
संसार जणू एकटीचा, उपस्तेय डबल कष्ट
लोळताय काय, फोडणीसाठी हवाय लसून सोलून
माझ्याजागी दुसरी, गेली असती कधीच पळून
सांगेल तेवढेच, बाई करता तुम्ही काम
एक दिवस मिळेना, जीवाला कधी आराम
नेहमीच्या कटकटीने, राजाचा होतो दास
आता कळले, मंडपातून का पळाले रामदास
--
गजानन लोखंडे
gaja.lokhande@gmail.com
बिछाने ठेवले का, उचलून आत
बातम्यांचा रतीब, नका हो पाडू
जळमटे दिसतायत नं, घ्या जरा झाडू
लवकर उठून, काय दिवे लावले
आंघोळीचे पाणी, तापलेले निवले
पुरे झाला पेपर, जावून या बाजारात
आठवडी सामान संपले, लक्ष द्या घरात
येताना दीड कीलो चिकन लेग, आणा मस्त
संसार जणू एकटीचा, उपस्तेय डबल कष्ट
लोळताय काय, फोडणीसाठी हवाय लसून सोलून
माझ्याजागी दुसरी, गेली असती कधीच पळून
सांगेल तेवढेच, बाई करता तुम्ही काम
एक दिवस मिळेना, जीवाला कधी आराम
नेहमीच्या कटकटीने, राजाचा होतो दास
आता कळले, मंडपातून का पळाले रामदास
--
गजानन लोखंडे
gaja.lokhande@gmail.com
8 comments:
हा हा हा ... !!
आता कळले, मंडपातून का पळाले रामदास :D
सहीच!
हलकीफुलकी आणि मस्तच ... :)
हे हे हे
झक्कासच जमलीय..!!
घराघरातून पहायला मिळणारे चित्र!
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद - गजानन लोखंडे
wow, i like jamtay jamtay!! Khupach chhan
asaa ha ravivaar nako re baabaa....
Post a Comment