आनंदच वेगळा!
साठी बुध्दी माझी
झाली की हो नाठी
कविता लिहिण्यासाठी
गावली कोरी पाटी
गैरवर्तन करतोय
सरळ सोप्या शब्दांशी
शब्दांतून खेळतोय
भोगलेल्या अब्दांशी
निवडुंगाचं रान
आठवतंय मला
त्यात सुध्दा रमण्याची
अवगत होती कला
आता बागेत गुलाबाचा
काटा पण रुततोय
थोड्याशा दु:खाने
जीव आत रडतोय
काळ पडला मागे
जीवनमान सुधारले
वेदनांचे भाव कसे
एकदम वधारले
श्रीमंतीच्या हव्यासानं
भाव विश्व अंधारलंय
भोगवट्याचं भूत
जास्तच उंडारलंय
कष्टानं खडबडलेला
हात आवडे तिचा
कष्ट सोडून तिनं नटावं
हीच आता मजा
पिठलं भाकर जेवण
झालंय आता वजा
स्टेटससाठी मागवतोय
न आवडणारा पिझा
आनंदाच्या नगरीत
रहतोय बनून बगळा
सुखी माणसाचा सदरा
होतोय मला डगळा
आयला, या सुखामुळे
माणूस होतोय पांगळा
गरिबीत जगण्याचा
आनंदच वेगळा!
--
निशिकांत देशपांडे
nishides1944@yahoo.com
झाली की हो नाठी
कविता लिहिण्यासाठी
गावली कोरी पाटी
गैरवर्तन करतोय
सरळ सोप्या शब्दांशी
शब्दांतून खेळतोय
भोगलेल्या अब्दांशी
निवडुंगाचं रान
आठवतंय मला
त्यात सुध्दा रमण्याची
अवगत होती कला
आता बागेत गुलाबाचा
काटा पण रुततोय
थोड्याशा दु:खाने
जीव आत रडतोय
काळ पडला मागे
जीवनमान सुधारले
वेदनांचे भाव कसे
एकदम वधारले
श्रीमंतीच्या हव्यासानं
भाव विश्व अंधारलंय
भोगवट्याचं भूत
जास्तच उंडारलंय
कष्टानं खडबडलेला
हात आवडे तिचा
कष्ट सोडून तिनं नटावं
हीच आता मजा
पिठलं भाकर जेवण
झालंय आता वजा
स्टेटससाठी मागवतोय
न आवडणारा पिझा
आनंदाच्या नगरीत
रहतोय बनून बगळा
सुखी माणसाचा सदरा
होतोय मला डगळा
आयला, या सुखामुळे
माणूस होतोय पांगळा
गरिबीत जगण्याचा
आनंदच वेगळा!
--
निशिकांत देशपांडे
nishides1944@yahoo.com
3 comments:
समृध्दीच्या मागे लागून खऱ्या सुखापासून दूर जाणाऱ्या जिवाची परवड चांगली मांडली आहे कवितेत. आवडली कविता.
सहीच विचार, अगदी सहमत ...कविताही छान झाली आहे ...
क्रांतीच्या विचारांशी सहमत.
सुंदर कविता..
Post a Comment