प्रतिभेस
तू यॆतॆस आणि जातेस
येताना कळ्या आणि फुलंही
घेऊन येतेस!
कधी अस्वस्थ,सैरभैर मनानं,
तर कधी धुंद होऊन
रकानेच्या रकाने लिहीत बसते
तेव्हा तू प्रकट होतेस
अगदी चार ओळी बनून!
तुला कस कळतं!
माझ्या मनात काय आहे?
आणि मला नेमक काय सांगायच आहे?
जेव्हा जेव्हा मला एकट वाटतं
तेव्हा तेव्हा माझी सोबत करतेस!
कधी स्वर तर कधी ताल
शब्दरुपी लय आणि रसही घेवून येतेस
आणि जगण्याला अर्थ देतेस!
दूर गेले तुझ्यापासून तरी
तिथेही प्रकट होवून
अगदी जीवाभावाची मैत्रीण बनून येतेस!
खरच मिळाला जर पुन्हा जन्म
तर येशील का पुन्हा कायमचीच
माझी प्रतिभा होऊन?
माझ्याच कवितांसाठी कळ्या घेऊन!
माझ्याच कवितांसाठी कळ्या घेऊन!
--
प्रा. कांचन शेंडे
kshende.63@gmail.com
येताना कळ्या आणि फुलंही
घेऊन येतेस!
कधी अस्वस्थ,सैरभैर मनानं,
तर कधी धुंद होऊन
रकानेच्या रकाने लिहीत बसते
तेव्हा तू प्रकट होतेस
अगदी चार ओळी बनून!
तुला कस कळतं!
माझ्या मनात काय आहे?
आणि मला नेमक काय सांगायच आहे?
जेव्हा जेव्हा मला एकट वाटतं
तेव्हा तेव्हा माझी सोबत करतेस!
कधी स्वर तर कधी ताल
शब्दरुपी लय आणि रसही घेवून येतेस
आणि जगण्याला अर्थ देतेस!
दूर गेले तुझ्यापासून तरी
तिथेही प्रकट होवून
अगदी जीवाभावाची मैत्रीण बनून येतेस!
खरच मिळाला जर पुन्हा जन्म
तर येशील का पुन्हा कायमचीच
माझी प्रतिभा होऊन?
माझ्याच कवितांसाठी कळ्या घेऊन!
माझ्याच कवितांसाठी कळ्या घेऊन!
--
प्रा. कांचन शेंडे
kshende.63@gmail.com
5 comments:
मस्ताय
सुंदरच!
हे लिहताना तरी ती नक्कीच तुमच्याकडे होती... :)
सुंदर लिहल आहे...
सुपर्ब..!
Atishay sundar kavita!Dar varshi ashach kavita lihal hi apeksha..Ashwini,Pooja,Shubham,Amruta,Anuradha Shende.
Post a Comment