श्राद्ध

घास ठेवताना म्हंटले काव काव
कावळ्याने सुनावले, गरजेपुरता देता भाव
तिरस्कार वरीसभर, उकीरड्यावरी ताव
अपायकारक आरोग्यास, तुम्हालाही ठाव

युनियन मध्ये आमचा, पास झाला ठराव
पितृ पक्षाचा पिरीयड, दुप्पट बढाव
पुण्याईसाठी तुमच्या, बोलवी काव काव
मुले मागतात पिझ्झा- चायनीज, ठेवा जरा राव

जाता अनेक ठिकाणी, पोटात होई गडबड
आमंत्रणे घेता घेता, मिळत नसते सवड
विचार करा मागण्यांचा, व्यर्थ नसे बडबड
स्फूर्ती स्थान अण्णा, मागणी आमची सडेतोड

म्हणाल आता, बरेच कि हो फॉरवर्ड
पुढील पिढी आमची, रिटर्न OAXFORD
पुढील खेपेस चार्जेस, we accept क्रेडीट कार्ड
गंभीर जखमी कावळ्यांसाठी, उभारतोय आय सी यु वार्ड

चालू होतेय काव काव काल सेंटर
लावा आगाऊ, टोल फ्री नंबर
देताच आम्ही दगा, फासा डांबर
स्पेशल व्हाईट कलरला, पडती शंभर

वाईट वाटून ,घेवू नका रे बाबा
गेल्यावरच आठवतात, कसे तुम्हा आजोबा
जिवंतपणी माणसाला, हवे असते प्रेम
व्यर्थ सारी मेहनत अन ती सोनेरी फ्रेम
--
गजानन लोखंडे
gaja.lokhande@gmail.com

6 comments:

Suhas Diwakar Zele October 20, 2011 at 1:38 PM  

जिवंतपणी माणसाला हवे असते प्रेम,
व्यर्थ सरी मेहनत अन ती सोनेरी फ्रेम !!!

व्वा.. मस्त जमलीय !!

क्रांति October 20, 2011 at 6:56 PM  

आधुनिक कावकाव भारीच आणि शेवटची कलाटणी खूपच खरी खरी. आवडली कविता.

Meenal Gadre. October 20, 2011 at 7:08 PM  

अगदी सत्य !!

GAJANAN LOKHANDE October 22, 2011 at 12:34 PM  

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद - गजानन लोखंडे

Suresh Shirodkar November 9, 2011 at 8:19 PM  

शेवटची कलाटणी खूपच आवडली.

GAJANAN LOKHANDE November 10, 2011 at 1:36 PM  

प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP