एकशिपी

शिजण्यासाठी लागणारा वेळ: १५-२० मिनिटे

साहित्य:
एक शेर तसरे मुळे (एक शिपी)
कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी
आले लसूण पेस्ट १ चमचा
लसूण पाकळ्या ३-४
लाल तिखट ३ चमचे
गरम मसाला १/२ चमचा
हळद १/४ चमचा
मीठ (चवीनुसार)
कोथिंबीर (आवडीनुसार)
फोडणीसाठी तेल

कृती:
१. प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढर्‍या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये. त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते सोबतच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.
२. कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे.
३. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.
४. परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे.
५. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे.
६. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.


स्वच्छ धुतलेले तसरे मुळे



या व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे शिपी फिरवावी



चिरलेले मुळे



एकशिपी



एकशिपी आणि काट



शिजलेली तयार एकशिपी


टीप:
चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.
--
सिद्धार्थ
nasatiuthathev@gmail.com

7 comments:

सुहास October 20, 2011 1:09 PM  

सिद्ध्या ऑन फायर... लई भारी रेसीपी :) :)

प्रतिक ठाकूर October 20, 2011 1:38 PM  

एकदम भान्नाट प्रकार आहे हा.
माझा अत्यंत आवडीचा.
वाफाळता भात आणि वरून हा रस्सा.. एकदम स्वगीर्य अनुभूती. :)

davbindu October 20, 2011 11:55 PM  

शिपी तर भारी लागतेच पण हा रस्सा असा काही अप्रतिम लागतो ना कि सांगायलाच नको... सिद्ध ..मस्तच रे ..तोंडाला पाणी आणलास एकदम ..

bhagyashri October 21, 2011 12:24 PM  

tondala pani sutale ,vvva mast!!!

Kanchan कांचन October 24, 2011 8:15 PM  

सी-फूडच्या वाटे मी फार जात नाही पण ही पाककृती ऐकून माहीती आहे. तिसर्‍या म्हणजे काय असतं? तयार झालेल्या एकशिपीचा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटतंय. पण सी-फूड... असो. ही रेसिपी माझ्या दोन मैत्रीणींना पाठवली आहे. व्हिडीओ दिलास ते खूप चांगलं केलंस.

mau October 24, 2011 9:42 PM  

भारी रे!! कधी पाठवतोस बोल..खरच भाताबरोबर ह्याचा रस्सा..बाईईईई....तोंपासु रे...

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP