चैत्रपालवी

त्या निष्पर्ण वृक्षाच्या शेंड्यावर उगवलेली ती पालवी.... चैत्रपालवी.... वसंताच्या आगमनाची ती चाहुल. नवजिवनाच्या आगमंची हळुवारशी एक दस्तक. निसर्ग जणू प्रसन्नतेने करतोय उधळण आपल्या सुष्टतेची. नवोदिताला जोजवत हळुवारपणे , हर्षोल्हासित करत सगळ्याना .... होतेय सुरुवात एका नवजिवनाची ...मोहकशी.

माझी नजर चुकवून आली होय तू?... तापलेला रविराज ... वाढलाय त्याचा तो जळफळाट. क्रुद्ध नजरेतून ओकतोय तो आग आता. बाळसं धरलेल्या पालवीलाही जाणवतोयं त्याचा तो जळफळाट. रांगणारं ते बाळ आता उभं होऊ लागलायं आपल्या पायावरं, आणि अत्यंतधैर्याने करतायं सामना त्या रविराजाच्या दाहकतेचा. ग्रीष्माच्या दाहकतेत , कधी गुलमोहोराला, तर कधी पळसाला, कधी निम्बाला तर कधी वडाला लपेटून प्रयत्न चालला आहे ...अणि तेहि अगदी आतून खोलवरून शोषत जीवन रस .... जगताहेत आणि जगवताहेत त्यावेलीला...

तो 'इश्वर', 'अल्ला' की 'आकाशतला बाप'.... मग हळूच हसतो , बघून त्यांची ती धडपड जगण्याची, बघून त्यांची ती आंस जगण्याची. टपकन ओघळतात दोन आनंदाश्रु त्याच्या डोळ्यातून. दाद देत त्यांच्या त्या जिद्दीला, धड़पडीला .... हर्षभरित तो गदगद होउन जातो आणि मग आपसुकच झारू लागतात त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रुंचेप्रवाह. वेड्या लोकांना वाटतं वर्षाऋतू आला.

मनमुराद पाझरतो, जीवनदान देतो,.... जगवतो आणि तगवतो , तो ही सृष्टि. पण कधी कधी आती हर्षित तर कधी अल्प हर्षितच राहतो तो अतिव्यस्तते मुळे .... आणि मग झरतो जास्ती कमी ... त्याच्या त्या कमी जास्त हर्षानं, इकडे मात्र घडून जात असतं खुप खुप काही. .... अगदी त्याच्या सुद्धा नकळत. त्याचं हसण आवरतं घेता घेता लक्षात येतं त्याच्या की पालवी आता पालवी नाही राहिलेली.

नवोन्मेशालिनी, नवोढा ...नवयौवना झालीय की ती आता. तिचं ते असं तारुण्यातलं पदार्पण सुखावून जतन धरित्रिला. अश्शी मिरवते, अश्शी मिरवते मग ती .... हिरवा शालू लेवुन वाट बघनारी नव वधुच जणू . ... तरुणाईचा तो जोश धुंद करून टाकत असतो सगळ्या सगळ्याना.

रागावून रागावून, तापून तापून , आता रविराज पण कधीचाच थकून गेलेला. बघत असतो कधी आड़ोश्यातुन ढगांच्या , तर कालवून मान तिरपी, त्या हिरव्याकंच तरुणाई कड़े. त्याच्या बघण्यात असते शीतलता जो पसरवत असतो त्या चंद्र चांदण्याकडून. शरदाच्या चंद्र चांदंण्यान्ना जणू हळूच सांगतो कानात... निवळलाय रे आता माझा राग. सगळीकडे असते शांतता ... पहुडलेली असते धरा, हिरवा शालू लेवुन, साड़ी कामंधामं आटोपून वामकुक्षी घेणा-या सासुरवाशीणी प्रमाणे. शांत निवांत. डवरलेला तो वृक्षराज , घनदाट सावलीचा तो हेमंती धनी. गारव्यात उगवणारी पहात आणि मग हळूच जाणवणारे ते उष्ण नि:श्वास, प्रियकराच्या बाहूपाशाताल्या त्या प्रेयसीचे जणू. सुरु असते एक तृप्त जीवन.

हळूच येते एक वार्‍याची झूळुक . जाणवते त्यात थोड़ी बोचरी थंडी. हलवून टाकते, अगदी आतून. वार्‍याच्या गतीची तीव्रता आती बोचरी होत जाते. वाढत्या वेगाची ती हवा ... त्या वाढत्या वेगाने हळूच विलग करते एक पान ... देठापासून ... आणि पानाला वाटतयं बिलगूनच रहावं . पांची धडपड बिलागायाची आणि वार्‍याचा प्राण जणू त्याला विलग करायचा. झालयं ...झालयं आगमन त्या शिशिराचं ..अगदी चोर पावलानी... अगदीहळूच.

बोचर्‍या थंडीचा वाढलेला कडाका, त्यातच थंडीपासून संरक्षणा साठी पांघरलेल्यां हिरव्या शालीचं करतोय तो वारा हरण .... कसला हां दुष्टपणा .... निसर्गाचा की नियतीचा. थंडीचा हां कडाका अन त्यात हें वस्त्रहरण ... पण जगायची आंस खुपच तीव्र असते नाही? आशेवाराच जगतोय ... अगदी निष्पर्ण ..अगदी निर्वस्त्र होउन ही. एखाद्या कडाक्याच्या थंडीत तपश्चर्या करणार्‍या प्राचीन तपस्व्या सारखा.

त्या उघड्या बोडक्या देहावर हळूच हसतो निसर्ग... निष्पर्ण झाडावर उगवते एक पालवी. चैत्रपालवी ... सुरुवात करत निसर्गचक्राची ...नवजीवनाची ...
--
सुनिल जोशी
starsvj63@gmail.com

4 comments:

Anonymous,  October 21, 2011 at 12:03 AM  

खूप सहज-सुंदर आहे लेख ....आवडला ...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 22, 2011 at 1:53 PM  

वर्षाराणीची विमाने म्हणून एक धडा लहानपणी वाचला होता, त्याची आठवण झाली. सुंदर आविष्कार!

SUNIL JOSHI October 23, 2011 at 10:00 PM  

धन्यवाद मित्रांनो, आपल्या अभिप्राय आणि सुचनांबद्दल, आपले अभिप्राय नक्कीच मला मदत करतील अजुन सुधारणे साठी...

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP