ते शिंकले तरीही
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते
जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?
दारिद्र्य पोसताना, गरिबीस राखताना
वाट्यात तज्ज्ञ अभये का एकजात होते?
--
गंगाधर मुटे
gangadharmute@gmail.com
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते
जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?
दारिद्र्य पोसताना, गरिबीस राखताना
वाट्यात तज्ज्ञ अभये का एकजात होते?
--
गंगाधर मुटे
gangadharmute@gmail.com
7 comments:
मुटेसाहेब, सुंदर आणि वास्तववादी रचना !!
मुटेसाहेब,
सुंदर रचना !!
खास रचना! सतारीचा शेर खूप खूप रुतणारा आणि तितकाच खरा.
अप्रतिम गझल मुटेसाहेब! आवडला!
वास्तववादी आणि बरच काही सांगणारी ...योग्य शब्दात मांडलत ...
खास मुटेटच..!! प्रचंड आवडली.
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे. :)
Post a Comment