इंद्रवलय
मी फारसा निसर्गप्रेमी नाही. परंतु इंद्रधनुष्य मात्र मला फार आकर्षित करतं. दर पावसाळ्यात सात रंगांची ती कमान कधी दिसेल याची मी आतुरतेने वाट पहात असतो आणि बहुतेक वर्षी, वरुणराजा ही माझी इच्छा पूर्ण करतो. अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसणं ही तशी सामान्य बाब आहे. परंतु ते पूर्ण वर्तुळाकार दिसणं हा दुर्मिळ योग माझ्या आयुष्यात ३ वेळा आला. हे पूर्णवर्तुळ सर्वसाधारणत: उंच घाटातून बसने प्रवास करताना दरीमध्ये, तसच विमानाच्या खिडकीतून आकाशात दिसल्याचे उल्लेख आणि फोटो Internet वर आढळतात. परंतु मला चार वेळा हे इंद्रवलय चक्क जमिनीवरून दिसलं आहे.
सर्वप्रथम दिसलं ते दादरला(मुंबई). साधारण १८/१९ वर्षांपूर्वी. माझ्या मामांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभासाठी मी दादरला, राम-मारुती रोड वरील एका छोट्या कार्यालयात गेलो होतो. दुपारचे १२-३०/१२-४५ वाजले होते. जेवण व्हायला थोडा वेळ होता म्हणून मी एकटाच बाहेर सटकलो. हॉल जवळच्या कोपर्यावर जरा आडोशाला उभा राहून सिगरेट पेटवली. छान २-३ दम मारले. सहज आकाशाकडे नजर गेली आणि... आणि.... ते दृष्य पाहून आवाक् झालो. आजवर चंद्राभोवती खळं पडलेल पाहिलं होतं. पण सूर्याभोवती मोठ्या आकाराचं सप्तरंगी रिंगण ....प्रथमच पाहत होतो .... अवर्णनीय, विलोभनीय दृष्य .... हरवून गेलो ....आजूबाजूचं भान अक्षरश: विसरलो .... सिगरेट जळत जळत बोटापर्यंत आली, चटका बसला तेव्हा भानावर आलो. त्या रस्त्यावर नेहमीच तुरळक वर्दळ असते त्यामुळे बहुधा मला कोणी पाहिलं नसावं. हॉलमध्ये गेलो, पाहिलेलं दृष्य वर्णन करून बाकीच्यांबरोबर share करायचा प्रयत्न केला पण कोणीच फारसं लक्ष दिलं नाही. बहुतेक सर्व भोजनाचा आस्वाद घेण्यातच रंगले होते. त्या सप्तरंगी रिंगणाचं मी माझ्या मनात मग नामकरण केलं - 'इंद्रवलय'!
दुसर्या वेळी मला इंद्रवलय दिसलं, ते केळवे (पालघर तालुका) या गावात. केळवे येथे आमचा एक छोटासा प्लॉट आणि घर आहे. काही कामानिमित्त मी सकाळी तिथे गेलो होतो. मुंबईकडे जाणारी दुपारची १२-४० ची रेल्वे गाडी पकडण्यासाठी मी स्टेशनकडे चाललो होतो. आणि अचानक इंद्रवलयाने दर्शन दिलं. यावेळेला ते अधिक स्पष्ट दिसत होतं. केळव्याच्या त्या निसर्गरम्य खेडेगावात ते इंद्रवलय अधिकच आकर्षक भासत होतं. यावेळी तरी कोणाबरोबर तरी हे दृष्य share करावं अशी इच्छा झाली. परंतु त्या खेडेगावातल्या संपूर्ण रस्त्यावर माझ्याव्यतिरिक्त कोणीही माणूस दिसत नव्हता. मधूनच वर पहात पहात चालताना जरा एक वळण घेऊन पुढे सरकलो... एक खेडूत समोरून येताना दिसला. निदान याच्याबरोबर तरी ते स्वर्गीय दृष्य share करू असा मनात विचार आला. पण शक्य नव्हतं. ते महाशय फुल टू/टल्ली/पिंडक अवस्थेत होते. आधीच स्वर्गात विहरणार्या त्या खेडूताबरोबर काय कर्म share करणार ! माझ्या जवळून जाताना मात्र तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघताना आढळला. कदाचित मी वर बघत बघत चालत असल्याने त्याच्यासारखा ‘कॅट वॉक’ करीत होतो की काय देव जाणे !!!
तिसर्यांदा मी इंद्रवलय काश्मीर मध्ये पाहिलं. अडीच/तीन वर्षांपूर्वी आम्ही केसरी टूर्स बरोबर काश्मीर सहल केली. एका ठिकाणी क्रिकेटच्या बॅट बनविण्याचा कारखाना बघून परत बसमध्ये बसण्याकरिता चाललो होतो. इतक्यात त्या स्वर्गीय सप्तरंगी वलयाचं मनोहारी दर्शन झालं. बरोबरच्या सहप्रवाशांना मी ते दाखवलं. प्रथमच पहात होते सर्वजण. पण मी मात्र तिसर्यांदा पहात असल्याने सर्वांपेक्षा स्वत:ला अधिक भाग्यवान समजत होतो. फोटो काढायची इच्छा झाली, पण कॅमेरा बसमधल्या बॅगेत होता. धावत सुटलो बसकडे, धसमुसळेपणाने बॅगेतून कॅमेरा काढला आणि रस्त्यावर धाव घेतली...काय रे देवा! ...इंद्रवलय अंतर्धान पावलं होतं.
परत चौथ्यांदा इंद्रवलय दिसलं ते परत मुंबईमध्ये २८-९-२०१० रोजी सकाळी ११-१५/११-३० च्या सुमारास. मी बोरिवली-दत्तपाडा या विभागात वाण्याच्या दुकानात काही जिन्नस आणायला गेलो असता, सहज आकाशाकडे नजर गेली आणि विलोभनीय अशा इंद्रवलयाचं दर्शन घडलं. त्यावेळी दिसलेल्या इंद्रवज्राच्या वर्तुळाचा जेमतेम १५% भाग वगळता बाकी भागात हा सप्तरंगी वक्राकार पट्टा सुमारे १५/२० मिनिटांपर्यंत सहज दृश्यमान होत होता. नंतर हळू हळू तो विरळ होत गेला. इंद्रवज्र दिसताक्षणीच मी ताबडतोब मोबाईल वरून दोन फोटो घेतले. अर्थात, इतक्या मामूली कॅमेर्याच्या सहाय्याने फारसे चांगले फोटो येणं शक्य नव्हतं. रस्त्यातील अनेकांना ते अपूर्व दृश्य दाखवल. काही लोकांनी फोटो काढले, तसंच १-२ अपरिचित माणसांनी माझ्या मोबाईल वरील फोटो Blue-tooth च्या सहाय्याने त्यांच्या मोबाईलवर transfer करून घेतले. मी काढलेले फोटो सोबत दिले आहेत.
मध्यान्हीची वेळ, सूर्य माथ्यावर, सूर्याकडे सहज पहाता येईल इतपतच अभ्राच्छादित आकाश, हवेत पावसाळी गारवा, केव्हाही पावसाची हलकी सर येईल असं एकंदरीत वातावरण; पावसाळ्याच्या दिवसात निर्माण झालं की मी खिडकीतून दर ५ मिनिटांनी आकाशाकडे पहात असतो...इंद्रवलयाच्या दर्शनाभिलाषेने.
(हा लेख फक्त हा स्वर्गीय अनुभव सर्वांशी शेअर करावा इतक्याच उद्देशाने लिहिला आहे. ‘गदिमां’ सारखी शब्दसंपदा ज्याच्याकडे आहे, तोच इंद्रवलयाचं शब्दात वर्णन करू शकेल. मेरे बस की बात नहीं| )
--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in

2 comments:
उल्हासजी नशीबवान आहात ... :)
आभार आम्हाला इंद्र्वलयाच दर्शन घडवल्याबद्दल ...
काका, तुम्ही एकदा फोन करून मला हे इंद्रवलय दिसतंय ते सांगितलं होतंत पण तेव्हा काही दिसलं नाही. तो योग अजूनही जुळून आलेला नाहीच. तुम्ही नशीबवान! एकदा नव्हे तर चार वेळा या इंद्रवलयाने तुम्हाला दर्शन दिलं आहे.
Post a Comment