हेमंत करकरे
मुंबई वरील अतिरेकी हल्ल्याच्या वेळी टी..व्ही. प्रक्षेपण बघताना सुचलेली गजल. खरं सांगायचं तर कलमेतून ओघळलेली गझल!
दाटून कंठ काही वदणार आज आहे
कलिजा हिमालयाचा थिजणार आज आहे
होते जिवंत जेव्हा जखमा दिल्या जयानी
त्यांचेच तोंड काळे होणार आज आहे
शहिदास काय देता श्रध्दांजली फुकाची?
भोंदूगिरी तुम्हाला हसणार आज आहे
धरली कधीच नव्हती आशा कुण्या फळाची
त्याच्या समोर ईश्वर दिपणार आज आहे
अंधार जीव घेणा करतोय राज्य जगती
तो एकला कवडसा पुरणार आज आहे
नवसूर्य पाहिला मी काळ्या कभिन्न रात्री
सूर्यास अर्घ्य देण्या बसणार आज आहे
अधुनिक वाल्मिकीला पाहून कांड सारे
लिहिण्यास राम नवखा मिळणार आज आहे
बलिदान व्यर्थ नाही, ना कार्य व्यर्थ त्याचे
हिजडा जिहादवादी हरणार आज आहे
दु:खी कुटुंब त्यांचे अश्रू कसे पुसावे?
नियतीच हात त्यांचा धरणार आज आहे
"निशिकांत" याद येता हेमंत करकरेची
हा बांध आसवांचा फुटणार आज आहे
--
निशिकांत देशपांडे
nishides1944@yahoo.com
दाटून कंठ काही वदणार आज आहे
कलिजा हिमालयाचा थिजणार आज आहे
होते जिवंत जेव्हा जखमा दिल्या जयानी
त्यांचेच तोंड काळे होणार आज आहे
शहिदास काय देता श्रध्दांजली फुकाची?
भोंदूगिरी तुम्हाला हसणार आज आहे
धरली कधीच नव्हती आशा कुण्या फळाची
त्याच्या समोर ईश्वर दिपणार आज आहे
अंधार जीव घेणा करतोय राज्य जगती
तो एकला कवडसा पुरणार आज आहे
नवसूर्य पाहिला मी काळ्या कभिन्न रात्री
सूर्यास अर्घ्य देण्या बसणार आज आहे
अधुनिक वाल्मिकीला पाहून कांड सारे
लिहिण्यास राम नवखा मिळणार आज आहे
बलिदान व्यर्थ नाही, ना कार्य व्यर्थ त्याचे
हिजडा जिहादवादी हरणार आज आहे
दु:खी कुटुंब त्यांचे अश्रू कसे पुसावे?
नियतीच हात त्यांचा धरणार आज आहे
"निशिकांत" याद येता हेमंत करकरेची
हा बांध आसवांचा फुटणार आज आहे
--
निशिकांत देशपांडे
nishides1944@yahoo.com
3 comments:
सुंदर रचना...!!
आम्हा सगळ्यांच्या मनातल्या भावना, ह्या शब्दांनी व्यक्त झाल्या :) :)
उत्तम आहे रचना. अगदी आतून उतरलेली.
खूपच छान! अगदी आतून लिहिलंय निशिकांत! फारच आवडलं!
Post a Comment