कलाकंद

वेळ: १५ मिनिटे (खवा आणि पनीर तयार असल्यास)
१२ ते १५ मध्यम चौकोनी तुकडे

साहित्य:
१ लिटर दुध
१/२ टीस्पून सायट्रिक अॅसीड किंवा एका लिंबाचा रस
दीडशे ग्राम खवा
३/४ कप साखर (साधारण १५० ते १७५ ग्राम)
१/२ टीस्पून वेलची पुड
पिस्त्याचे पातळ काप


कृती:
१) दुध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले कि त्यात चिमटीचिमटीने सायट्रिक अॅसीड घालून तळापासून ढवळावे. दुध फाटले कि सुती कपड्यावर पनीर गाळून घ्यावे.
२) गाळलेले पनीर फडक्यातच असताना गार पाण्याने थोडे धुवून घ्यावे म्हणजे लिंबाची/ सायट्रिक अॅसीडची आंबट चव आणि वास निघून जाईल. गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.
४) खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. साखर वितळली कि मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी पनीर आणि वेलची पुड घालावी.
५) पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच टीनच्या ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे. वरून पिस्त्याचे काप घालावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

वड्या उरल्या तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

टीपा:
१) आवडीनुसार खवा किंवा पनीरचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) पनीर ताजेच बनवावे. तसेच दुध फाटल्यावर गाळून, घट्ट पिळून लगेच पनीर वापरावा. पाणी निथळण्यासाठी खूप वेळ टांगून ठेवू नये.
३) मी वेलची-केशर यांचे रेडीमेड सिरप मिळते ते चमचाभर वापरले होते. त्यामुळे रंगही पिवळसर येतो आणि केशर वेलचीचा स्वादही छान येतो.
४) मी खवा रिकोटा चीजपासून बनवला होता. साधारण ४२५ ग्राम रिकोटा चीजपासून पावणे दोनशे ग्राम खवा बनतो.
५) ३/४ कप साखरेमुळे बेताचे गोड होते. अजून गोड हवे असेल तर २ ते ३ टेस्पून साखर वाढवावी.
६) मिश्रण ट्रेमध्ये थापल्यानंतर वरून चांदीचा वर्खही लावू शकतो. त्यामुळे कलाकंद अधिक आकर्षक दिसेल.
--
वैदेही भावे
chakalionline@gmail.com

9 comments:

सुहास October 20, 2011 at 1:03 PM  

मस्त.. मला खूप आवडतं कलाकंद :) :)

प्रतिक ठाकूर October 20, 2011 at 1:45 PM  

लहान असताना आईच्या नकळत दुधात लिंबू पिळायचो त्याची आठवण झाली. नंतर आई फाटलेल्या दुधात साखात टाकून त्याचा कलाकंद करीत असे. :)

क्रांति October 20, 2011 at 7:08 PM  

झक्कास! तोंडाला पाणी सुटलं.

Anonymous,  October 21, 2011 at 12:14 AM  

mastach ....yum yum...

Anonymous,  October 21, 2011 at 12:22 AM  

यम्मी ..आय एम लवीन इट ... :)

Kanchan कांचन October 24, 2011 at 8:11 PM  

मला स्वत:ला रेडिमेड पनीरपेक्षा घरी पनीर बनवून मग त्याचा पदार्ध बनवणे आवडते. स्वीट डीश तर आवडीच्या आहेतच, त्यामुळे कलाकंद बनवला की नक्की कळवेन तुम्हाला.

Anonymous,  October 25, 2011 at 1:17 AM  

Ricotta cheese pasun khava kasa banavla tyachi recipe post karu shakal ka?

भानस October 26, 2011 at 5:45 PM  

मस्तच गं! अगदी तोंपासु! करुन पाहते.

भानस October 26, 2011 at 5:45 PM  
This comment has been removed by the author.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP