क्षणाचे प्रसंग..

क्षणांचा समुद्र तर तू आहे.. उसंतीने लाभलेला समुद्र तू, त्या किनारी मला क्षणाचे प्रसंग चितारू दे..

तळ्यात साठलेले तरंग सुटत सुटत तटावर विसावणारे..

रंग मधुर खुलवणारी तुटक तुटक संध्याकाळ..

दूर शिखरावर स्पष्ट हालचालींनी फडफडणारा ध्वज..

आकाराला आलेली रचना निसर्गाची.. सौंदर्य ते जन्मत: माणसाकडून नष्ट होणारे....

नुकतेच संबंध तुटलेल्या माणसास नजरेने नजाकत व्यक्तावणारा निरोप...

कुठे ठरवलेला कुठे हरवलेला प्रसंग शोधत.. गाण्यात विसरलेली मने..

उडणारा बेबंद फार तरी न आळवून धरलेला.. माणसांचा झेपावणारा पतंग

दार ठोठावणारी गात्रे ही.. हळुवार लोटणार स्वतःला ती उंच कड्यावरून....

काट्यांनी विखरून ओळख करून देणारी.. क्षणांनी भरलेली एकच कोठडी...

भेटणार एकदाच आणि परत कधी न भेटणारा.. सर्व विसरवणारा मरण क्षण..
--
योगेश विनोद जोशी
yogujoshi@gmail.com

3 comments:

क्रांति October 20, 2011 at 9:21 PM  

एक एक चौकट जीवंत होत जावी, असा मरण क्षण!

Amit October 28, 2011 at 10:33 PM  

नेहमीप्रमाणेच गूढ आणि गंभीर
दोन ओळींच्यामध्ये असलेलं दाट अर्धोन्मीलित कथाबीज
वाटतं कधी मधल्या टींबानाच जास्त अर्थ आहे.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP