Chick Video Studio एक ऑल इन वन व्हिडीओ एडिटींग सॉफ्टवेअर

व्हिडीओ एडीट करण्याची किंवा करावयास लागण्याची कारणे अनेक आहेत. काहींच्या मते व्हिडिओ एडिटींग हे फक्त मिडियाशी संबंधित लोकांचे काम असते, तर काहींना नक्की तो व्हिडीओ एडीट का करायचा आणि एडीट म्हणजे नक्की काय हेच मुळात माहित नसते. खरंच का गरज पडते आपल्याला व्हिडिओ एडीट करण्याची? व्हिडिओ एडिटींगचा आणि आपला काही थेट संबंध आहे की नाही? आपण बघुयाच आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही घटनांचा व्हिडिओ एडीटिंगशी काय संबंध आहे की नाही ते!

गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला एक व्हिडिओ दाखवला, जो त्याने त्याच्या कॅमेर्‍याने रेकोर्ड केला होता. एक मजेशीर व्हिडीओ होता तो पण व्हिडिओ पहात असताना मध्येच काही अनावश्यक गोष्टी अनपेक्षितपणे रेकॉर्ड झाल्या होत्या. काही ठिकाणी अधिकच ब्लर इफेक्ट जाणवले आणि अशा बर्‍याच गोष्टींमुळे तो व्हिडिओ व्य्वस्थित दिसत नव्हता. मग असे अनावश्यक क्षण मी त्याला त्या व्हिडीओमधून काढुन टाकायला सांगितले, तर तो म्हणाला, "मला यातले काही कळत नाही. तुलाच काही जमते का ते पहा."

परवा दुसर्‍या एका मित्राचा मेसेज आला की त्यांना कॉलेजमध्ये व्हिडिओ प्रेझेण्टेशन दाखवायचे आहे, त्यासाठी इंटरनेटवरून काही व्हिडिओज डाऊनलोड केलेत पण ते सगळे वेगळेवेगळे आहेत आणि त्याला ते एकत्रित करुन त्यात काही स्वरचित संभाषणे (स्पीचेस) टाकायची होती. हे सगळे कसे होणार म्हणून त्याने मला मेसेज केला होता.

मध्यंतरी आणखी एका मित्राने मला त्याच्या लग्नाचे फोटो दाखवले. त्याचे स्वप्न होते की त्याच्या लग्नाचे व्हिडिओ शुटिंग व्हावे. पण मध्यमवर्गीय माणसाला १२ महिने भेडसावणार्‍या पैशांच्या जांगडगुत्त्यामुळे ते काही त्याला जमले नाही. हे फोटोससुद्धा त्याच्या सासुरवाडीच्याच कोणीतरी डिजीटल केमेर्‍याने काढले होते म्हणे आणि मग याने फोटोज आल्बमसाठी म्हणून काढून आणले होते.

आता तुम्ही म्हणाल या तीन गोष्टींचा आणि व्हिडिओ एडिटिंगचा काय संबंध? पण या तीनही गोष्टीं करण्यासाठी दोन गोष्टी हव्यात. तज्ज्ञ तांत्रिक सल्लागार आणि थोडी रक्कम.

पण जर तुमच्याकडे संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही या गोष्टीं अगदी सहज करू शकता ते ही अगदी चकटफू! आहे की नाही भन्नाट कल्पना? पण ही कल्पनात अंमलात आणायला ज्या सॉफ्टवेअर्सची गरज असते ती शक्यतो सहजासहजी मोफत नसतात आणि असलीच तर त्यात काही तरी लहान मोठ्या त्रुटी असतात किंवा मग ती ट्रायल व्हर्जन मध्ये उपलब्ध असतात. इंटरनेटच्या महाकाय दुनियेत भटकत असताना तमाम सॉफ्टवेअर्स हाताळण्याचा आणि त्यातील त्रुटी व फायदे शोधण्याचा अनोखा छंद मला कधी लागला, हे कळलेच नाही. या छंदामुळे नक्की फायदा झाला की तोटा, याचे उत्तर आजतागायत मला मिळालेले नाही. पण असेच एकदा व्हिडिओशी संबंधित काही सॉफ्टवेअर्स शोधताना हाती लागलेले हे सॉफ्टवेअर.

Chick Video Studio हे ऑल इन वन असे एक व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे, ज्यात खूप काही करता येऊ शकते. एखादा व्ह्डिओ कट करणे किंवा त्यांतील काही निवडक क्षणांचे भाग कट करणे, दोन किंवा अधिक व्हिडिओ एकत्रित करणे, फोटो स्लाईडशो करुन त्यात हवी तशी गाणी टाकणे, इत्यादींसारख्या गोष्टी या सॉफ्टवेअरमध्ये सहज शक्य आहेत. Chick Video Studio हे सोफ्टवेअर मोफत डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

डाऊनलोड केलेले सोफ्टवेअर एका विशिष्ट फोल्डरमध्ये तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल.


CVSTKsetup या नावाची एक .exe म्हणजेच executable फाईलवर डबल क्लिक करा आणि खालील चित्रांत दाखविल्याप्रमाणे अनुक्रमे इंस्टोलेशन प्रक्रिया करून हे सॉफ्टवेअर इनस्टॉल करा.








इनस्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर Chick Video Setup हे सॉफ्टवेअर सुरू होईल आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन साठी एक छोटी विंडो दिसू लागेल. त्या विंडोमध्ये आपला स्वतःचा ई मेल पत्ता टाकून ते सॉफ्टवेअर रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत करा. या रजिस्ट्रेशनचा उपयोग तुम्हाला संबंधित सॉफ्टवेअर्स कंपनींचे इतर सॉफ्टवेर्स आणि त्यांचे अपडेट्स थेट ई मेलद्वारे मिळवण्यासाठी होत असतो.



रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही हे सॉफ्टवेअर अधिकृतरित्या वापरू शकता. आपण या लहानग्या पण महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर्सची वैशिष्ट्ये क्रमवार पाहूया.

१. Play....



हे सॉफ्टवेअर स्वतः एक मिडिया प्लेअर म्हणूनही कार्यरत आहे. यात .avi, .mpeg, DVD, VCD, SVCD आणि .wmv या फॉरमॅट सपोर्टींग फाईल्स प्रामुख्याने बघितल्या जाऊ शकतात. तुम्ही हव्या त्या लोकेशनवर साठवून ठेवलेल्या म्हणजेच स्टोअर केलेल्या प्रामुख्याने वरील तीन प्रकारांतील फाईल्स नक्कीच पाहू शकता.

२.Convert


या पर्यायाद्वारे आपण एखाद्या किंवा हव्या त्या व्हिडिओ फाईल्सचा काही भाग अथवा ती संपूर्ण सपोर्टींग व्हिडिओ फाईल (वर नमूद फॉरमॅट पैकी), मूळ व्हिडिओ फाईल मध्ये काहीही बदल न करता एका फॉरमॅटमधून दुसर्‍या सपोर्टिंग फॉरमॅटमध्ये अगदी सहज परावर्तित म्हणजेच कन्व्हर्ट करू शकतो.

३. Cut


या पर्यायाद्वारे आपण एखाद्या किंवा हव्या त्या व्हिडिओ फाईल्सचा काही भाग सपोर्टींग व्हिडिओ फाईल मूळ व्हिडिओ फाईल मध्ये काहीही बदल न करता कट करू शकता. हल्ली बर्‍याच प्रमाणावर व्हिडिओ व्हिडीओ सॉन्ग्ज स्टोअर करण्याचे फॅड आहे. मला वाटते एखाद्या चित्रपटातील आपल्याला आवडलेले गाणे आपण नक्कीच या सुविधेचा वापर करून कट करून आपल्याकडे साठवून ठेवू शकतो.

४. Join


दोन किंवा अधिक सपोर्टिंग फॉरमॅटमधील विविध व्हिडीओ आपण सपोर्टींग फॉरमॅटमध्ये जोडू शकता. उदाहरणार्थ आपल्याला लता मंगेशकर यांची विविध व्हिडिओ गाणी एकाच व्हिडिओ मध्ये स्टोअर करण्यासाठी हा पर्याय नक्कीच कामी येईल, किंवा डान्स बसवण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या स्टेप्सचा एकत्रित एकच व्ह्डीओ करून देखील आपल्याला या पर्यायाचा उपयोग करता येईल.

५. Mix


या सुविधेमुळे एखाद्या संगीत नसलेल्या व्हिडिओमध्ये आपण स्वरिचित किंवा इतर कोणतेही संगीत मिसळू शकता. या पर्यायाचा उपयोग बहुतांश डबिंग क्षेत्रात मध्ये केला जातो. संपुर्णपणे नसले तरी काही प्रमाणात या पर्यायाच वापर नक्कीच उपयोगी ठरतो.

६. Transition


आपल्यापैकी ज्यांनी विंडोज मुव्हीमेकर किंवा निरो मुव्हिमेकर किंवा अन्य कोणतेही मुव्ही मेकर सॉफ्टवेअर्स हाताळली असतील, त्यांना ही सुविधा कशी वापरायची हे आपसूकच माहित असेल. बर्‍याच वेळा आपल्याकडे काही जुने आठवणीतले फोटॉज किंवा जुने व्हिडिओज साठवलेले असतात त्यांना एकत्रित करून, त्यांत काही गाणी आणि विविध इफेक्टस देऊन एक नवीन लूक देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो नाही का! ही सुविधा लग्नाचे व्हिडिओ शुटींग करणारे हमखास वापरतातच वापरतात. एखाद्या लग्नाचे व्हिडिओ शूटींग नंतर आलेली सिडी अथवा डिव्हिडी पाहिलेल्यांना नक्कीच याची खात्री पटेल.

Chik Video Studio हे सॉफ्टवेअर मी अजूनही व्हिडिओ एडीटींगसाठी वापरतो! तुम्ही कधीपासून वापरताय?
--
प्रथमेश शिरसाट
prathmesh.shirsat@gmail.com

6 comments:

धुंद रवी October 21, 2011 at 7:02 AM  

फारच महत्वाची माहिती...
आणि यासाठी तुझे मानावे तेवढे आभार थोडेच.

Suhas Diwakar Zele October 21, 2011 at 1:35 PM  

मस्त माहिती... बघतो वापरून :)

Meenal Gadre. October 22, 2011 at 7:20 AM  

मी नक्की करून पाहेन. शिकायला आवडेल. कधी तरी आपल्याच लेखात उपयोगी पडेल.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 22, 2011 at 1:55 PM  

प्रथमेश, छान माहिती आहे ही. हे सॉफ्टवेअर मी वापरून पाहीन. मध्यंतरी मला BDlot नावाचं एक व्हिडीओ एडिटींग सॉफ्टवेअर मिळालं होतं. आता ते उपलब्ध आहे की नाही माहित नाही. पण तू चेक करून पहा.

Amit,  November 2, 2011 at 9:04 PM  

kaahi quality loss hote kaa? asalyaas kitpat?

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP