रिझवान चाचा - भाग २

इम्रान घाईघाईने घरात शिरतो...

"अब्बा, मला तुमची सही हवीय ह्या कागदांवर."

"अरे हो हो..कसले कागद आहेत हे? कोर्टाचे दिसतायत.."

"हो अब्बा, आम्ही तुम्हाला वापरायला दिलेल्या जागेचं भाडं देणार, त्याचं हे अॅग्रीमेंट आहे. आम्हाला सगळं सरळ मार्गांनी करायचे आहे..."

"अरे त्याची काही गरज नाही.. घर तुझंच आहे..."

"नाही अब्बा, माझ्या पार्टनरला ते मंजूर नाही. सगळं कसं कायदेशीर व्हावं अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही सही करा बरं पटकन..."

"ठीक आहे, तुचं घे भाडं आणि तूच वापर खर्चाला, मला नको देऊस. तुझा पार्टनर तो कोण?"

"अहो, पवार बिल्डर्सच्या मालकाचा मुलगा आहे हो प्रथमेश. मोठी लोकं आहेत. परदेशात पण त्यांचे प्रोजेक्ट्स सुरु आहेत."

"अच्छा, बोल कुठे सही करायची आहे?"

"हं जिथे फुल्या मारल्या आहेत, तिथे सही करा."

"इम्रान, पेपर नीट बघितले आहेत नं बाबा?"

"हो अब्बा, तुम्ही सही करा फक्त."

"ठीक आहे, करतो."

(इम्रानचं ऑफिस सुरु झालं, चाचा आपलं पोरगा मार्गी लागला म्हणून खूप खुश असतात. जग्याकडे इम्रानचं कौतुक करताना, त्यांना शब्द सापडत नव्हते आणि जग्या डोळे भरून ते बघत होता. कितीतरी वर्षांनी स्वतःच्या पोरामुळे, ह्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला होता त्याने.)

----------

होता होता ५ महिने झाले, इम्रानचं ऑफिस सुरु होऊन पण चाचा उदास होते. त्यांचा धंदा खूप कमी झाला होता, गिर्हामईक मिळेनासे झाले होते. त्यांना पैश्याची कमी नव्हती, पण पिढीजात धंदा बुडताना त्यांना बघवत नव्हता. काही झालं तरी ते वखार बंद करायच्या विरुद्ध होते. इम्रान गेली दोन वर्ष त्यांच्या मागे लागला होता, "विकून टाका ही जागा बिल्डरला आणि इथे मोठा टॉवर बांधूया", पण नाही, चाचांना ते मान्य नव्हते. त्यांना इम्रानचे ते शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. रात्रीची झोप उडाली होती, दिवाळी एका दिवसांवर येऊन ठेपली होती. चाचा रात्रभर जागेच होते. शेवटी वैतागून साडेतीनच्या सुमारास ते उठले आणि खोलीत फेर्‍या मारू लागले. सहज त्यांनी बाहेर डोकावलं. इम्रानच्या ऑफिसबाहेर खूप गर्दी दिसली. दोन मोठे टेंपो, चार-पाच गाड्या, २०-२५ माणसं असा लवाजमा होता. त्यांना वाटले आपण जाऊन बघूया काय झालं पण पोरगा रागावेल म्हणून तिथेच खोलीत बघत उभे राहिले. इम्रान आणि प्रथमेश खूप घाईघाईने बोलत होते आणि त्या लोकांना काही तरी देऊन निघायला सांगत होते. चाचा विचार करत होते, "इतक्या सकाळी सकाळी ही लोकं काय करतायत?" पण कुठल्यातरी जागेवर काम करणारी मंडळी असतील म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आरामखुर्चीत शरीराला झोकून दिलं.

कळलंच नाही त्यांना की गाढ झोप कधी लागली ते, सकाळी जग्या त्यांना उठवायला आला.

"चाचा आज धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस. आज आणि उद्या धंदा बंद असेल. आईने पणत्या विकायला आणल्या आहेत. तिच्यासोबत जाईन मी मार्केटला. तेव्हढीच तिला मदत होईल माझी. तुमच्यासाठी हे चार दिवे आणले आहेत. संध्याकाळ झाली, की अंगणात लावा. लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी घरात येईल."

"जग्या, तुझा खरंच विश्वास आहे यावर? मी विचार करतोय ही वखार कोणाला तरी चालवायला देऊ भाड्याने... "

"विश्वास आहे आणि तुमचा पण बसेल. तुम्ही कोणाचं वाईट नाही नं केलं, तर देव पण तुमचं काही वाईट करणार नाही. वखारीला मागणी कमी आहे मान्य आहे, पण तुम्ही ती दुसर्‍याच्या हवाली करावी हे मला पटत नाही."

"ह्म्म! तुझा बाप पण हेच बोलायचा मला.. बिचारा लवकर सुटला. असो. जा तू..."

----------

संध्याकाळी सहाच्या सुमारास रिझवान चाचांचा एक कारागीर धावत पळत आला...

"मालिक ओ मालिऽऽऽक.... किधर हैं आप... मालिऽऽऽक.."

"क्या हुवा? मैं दिये जला रहा था... जग्या आयेगा तो मुझे डाटेगा... आज दीपावली है नं. तू बोल, क्या मुसिबत आयी तुझपे?"

"मालिक, अल्ला का कहर हो गया.. पूरे शहर मैं धमाके हुए हैं.."

"या अल्लाह..! ये कैसी घडी हैं? आज तो त्योहार का दिन और ऐसी आपदा?"

"मालिक, हजारो जाने गयी और उसमें.. उसमें..."

"उसमें उसमें मैं क्या? ठीक सें बोल.... इम्रान ठीक हैं नं?"

"मालिक, इम्रान की तो कोई खबर नही, पर जगदीश अल्लाह को प्यारा हो गया.. उसने उसकी अम्मी को घर भेज दिया, आपको प्रशाद देने के लिये.. और मार्केट मैं..."

(चाचा एकदम थंडगार पडतात) "या अल्लाह!... उस नन्ही जान का क्या कसूर था, मुझे उठा लिया होता!" (रडत रडत छाती बडवायला लागतात.)

"मालिक.. मालिक संभालो अपने आप को... आपको खुदा का वास्ता."

"किस खुदा का वास्ता दे रहे हो, जो मेरे बेटे जैसे जग्या को मुझसे दूर ले गया...नफरत हैं उससे मुझे, नफरत हैं.."

भाग १ भाग २ भाग ३


----------

सुहास झेले
suhas.zele@gmail.com

0 comments:

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP